मोर्शी आणि जवळच्या गावातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी स्वर्गीय अण्णासाहेब कानफाडे यांनी १९२७ साली शिवाजी उच्च माध्यमिक शाळेची स्थापना मोर्शी येथे केली. तदनंतर त्यांनी ही शाळा शिवाजी एज्युकेशन सोसायटी, अमरावती या संस्थेला शाळेचा आणखी विकास व्हावा म्हणून संचालनासाठी हस्तांतरीत केली. शिवाजी एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी १९३१-३२ मध्ये केली. विद्यालयात विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, कलादालन, भाषा व गणित प्रयोग शाळा इत्यादी विविध सुविधा आहेत. संस्था सातत्याने पात्र आणि प्रशिक्षित शिक्षकांद्वारे तांत्रिक ज्ञान प्रभावीपणे देण्याच्या ध्येयाने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचा आणि बुद्धीचा फायदा होत आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रीय भावना रुजविणे व राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे या दृष्टिकोनातून शाळेमध्ये एन.सी.सी., स्कॉऊट गाइड कार्यक्रम राबविण्यात येतात. शाळेदवारे रक्तदान शिबिरे, विविध जागरूकता मोहीम, स्वच्छता मोहीम, महिला सक्षमीकरण इत्यादी विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. आमचे मुख्य उद्दिष्ट असे उत्कृष्ट विद्यार्थी विकसित करणे आहे जे नंतर समाजाची सेवा करतील आणि देशाच्या प्रगतीसाठी काम करतील. म्हणून, मी सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाने प्रदान केलेल्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांचे जीवन बदलण्यासाठी आमंत्रित करतो.
मुख्याध्यापक,| अनु. क्र. | सदस्यांची नावे | हुद्दा |
|---|---|---|
| १. | श्री. हर्षवर्धन पी. देशमुख | अध्यक्ष |
| २. | Adv. गजाननराव केशवराव पुंडकर | उपाध्यक्ष |
| ३. | Adv. जयवंत विनायकराव पाटील (पुसदेकर) | उपाध्यक्ष |
| ४. | श्री. केशवराव जगन्नाथराव मेटकर | उपाध्यक्ष |
| ५. | श्री. दिलीप भगवंतराव इंगोले | कोषाध्यक्ष |
| ६. | श्री. हेमंत वासुदेवराव काळमेघ | सदस्य |
| ७. | प्राचार्य केशवराव रामकृष्णराव गावंडे | सदस्य |
| ८. | श्री. सुरेश जनार्दन खोटरे | सदस्य |
| ९. | श्री. सुभाष श्रीधरपंत बनसोड | सदस्य |
| १०. | श्री. विजय गोविंदराव ठाकरे | सचिव |
| ११. | डॉ. महेंद्र पुंडलीकराव ढोरे | सह.सदस्य |
| १२. | श्री. नरेश मधुकरराव पाटील | सह.सदस्य |
| १३. | श्री. पुरुषोत्तम शिवाजी वायाळ | सह.सदस्य |
| १४. | डॉ. अमोल मनोहरराव महल्ले | सह.सदस्य |